अनधिकृत बांधकामं डेप्युटी कलेक्टर, बीएमसीच्या आशिर्वादाने : प्रवीण दरेकर

मुंबई : मालाडमध्ये इमारत कोसळून जिवितहानी झाली आहे. पहाटेच्या सुमारास २ ते ३ मजली इमारत कोसळल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून काही लोकं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत तरुण आणि अल्पवयीन मुलांचाही मृत्यू झाला आहे. पहिल्याच पावसात दुर्घटना घडल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.

मालाड भागात अनधिकृत बांधकाम होत असतना महानगरपालिकेला वारंवार पत्र देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे घटना घडली आहे. मालाडमध्ये २ ते ३ माळ्याच्या इमारती बीएमसी, पोलीस आणि डेप्युटी कलेक्टरच्या आशिर्वादाने होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

अनधिकृत बांधकामं डेप्युटी कलेक्टर, बीएमसीच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाहीत. ज्यावेळी हे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी परवानगी दिली आहे का? दिली असेल तर त्यावेळी डेप्युटी कलेक्टर आणि पोलीस या सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी मगणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा