“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली”

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सतत सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. तसेच वादग्रस्त वक्तव्यांसाठी गोपीचंद पडळकर यांना ओळखलं जातं. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुनही त्यांनी मोठा वाद घातला होता.

यानंतर, आता जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केल्याचे दिसून येते. आता पुन्हा पडळकर यांनी ट्विट करून पवार काका-पुतण्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेली देवस्थानची जमिन ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली.

यानंतर आता लवकरच यांचं पितळ जगापुढे उघडं पडणार आहे, असं ट्विट पडळकर यांनी केलं आहे. असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. पडळकर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांच्या सातत्याच्या टीकेच्या रोख हा पवार कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे, यावेळीही त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केल्याचे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा