“दुर्दैवाने मी आमदार झालो नाही, अन्यथा मराठा आरक्षणासाठी पुन्हा राजीनामा दिला असता”

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यात केवळ एकमेकांकडे बोट दाखवत धूळफेक करण्याचे काम सत्ताधारी आणि विरोधी पक्ष करत आहेत. भाजपचे केंद्रात बहुमत आहे. त्यांनी येणाऱ्या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी प्रस्ताव आणावा व त्यास मंजूर करून घ्यावे. केंद्राने कायदा केला तर सर्वोच्च न्यायालयालादेखील ते मान्य करावे लागेल, असे मत व्यक्त करीत, दुर्दैवाने मी आमदार झालो नाही, अन्यथा मराठा आरक्षणासाठी पुन्हा राजीनामा दिला असता, असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी (ता.२७) सांगितले.

संभाजीराजे ज्या पक्षातर्फे राज्यसभेचे खासदार आहेत, त्याच भाजपची केंद्रात सत्ता आहे. 300 पेक्षा अधिक खासदार भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठीचा प्रस्ताव आणण्यासाठी संभाजीराजेंनी भाजपला भाग पाडावं, असा सल्ला हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी आपली मते मराठा आरक्षणावर मांडून तसा कायदा करण्याची मागणी सत्ताधारी भाजपकडे करावी. जर हा प्रस्ताव भाजपने नाकारला तर ते मराठा आरक्षणविरोधी आहेत, यावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याची किंमत येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना चुकवावी लागेल, असं देखील जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा