देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गायब?; दिल्ली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल

मुंबई : देशभरात कोरोनाचा कहर सुरूच असून केंद्र सरकारकडून संसर्ग रोखण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले जात आहेत. तसेच रुग्णांना अॅाक्सीजन, औषधांचा पुरवठा करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येक बाबींचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. देशातील सर्व सरकारी यंत्रणा या कामात गुंतल्या आहेत. अशातच आता दिल्ली पोलिसांत गृहमंत्री अमित शहा हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्टुडंट्स युनियन अॅाफ इंडियाचे (NSUI) सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांकडे अमित शहा हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीविषयी बोलताना ते म्हणाले, ‘संकटाच्या काळामध्ये राजकीय नेत्यांनी देशाची सेवा करणे, लोकाच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. अशा काळात या जबाबदारीपासून पळून जाऊ नये.’ असा टोला ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय सचिव आणि मीडिया प्रभारी लोकेश चुगने यांनी लगावला.

दरम्यान, अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की, फक्त भाजपचे? असा सवाल नागेश करियप्पा यांनी उपस्थित केला. आम्ही कोरोना काळात लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाणतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा बेपत्ता झाले आहेत, असंही करियप्पा यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा