InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘इंडियन फर्स्ट’-उमेश जाधव यांचा अनोखा उपक्रम

- Advertisement -

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. देशभक्तीची मशाल तेवत ठेवण्यासाठी ‘मंड्या टू पुलवामा’ हा उपक्रम राबविण्याचे कलावंत उमेश जाधव यांनी ठरविले आहे.

पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांसाठी तब्बल २० लाखांचा निधी बेंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या भूमिपुत्राच्या ‘मंड्या टू पुलवामा’ उपक्रमातून उभा राहात आहे. विशेष म्हणजे देश-विदेशातील कलावंतांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेल्या ‘म्युझिकॉज’ या ‘एनजीओ’अंतर्गत ‘मंड्या टू पुलवामा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Loading...

- Advertisement -

सहा राज्यांत जाऊन हुतात्मांचे जन्मस्थळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. नऊ एप्रिलला बंगळुरू येथील सीआरपीएफ (बीएलआर) डीआयजीपी, जीसी सनद कमल यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेत मंडिया येथील हुतात्मा गुरू यांच्या स्मृती आणि जन्मस्थळाला भेट देत तेथील माती घेतली. देणगीतून जमा झालेल्या 50 हजार रुपयांची मदत त्याने हुतात्मा गुरू यांच्या कुटुंबीयांना केली. पुढे केरळ, तमिळनाडू आणि कनार्टक येथील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या मोहिमेत केरळ येथील अरुण आणि अनिश हे दोन युवकही जोडले गेले असल्याचे उमेशने सांगितले.

Loading...

नागरिकांनी केवळ देणगी द्यावी, असा या उपक्रमाचा हेतू नाही. त्या उलट या उपक्रमाचा भाग म्हणून विविध रंगी टोप्या, बॅग, मातीची बाटली, टी-शर्ट, स्टिकर्स आदी वस्तुंची निर्मिती केली जात असून त्या वस्तुंच्या विक्रीतून मूळ उत्पादन खर्च वगळता शिल्लक रक्कम ही उपक्रमासाठी जमा केली जात आहे. त्याचवेळी उत्स्फूर्त देणगी देणारेही काही कमी नाहीत. लवकरच www.indianfirst.ngo ही वेबसाइटही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे टोपी असो की टी-शर्ट, सर्व उत्पादनांवर ‘इंडियन फर्स्ट’ एवढेच नाव असणार आहे, असेही त्यांनी उमेश जाधव म्हणाले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.