Upcoming Car Launch | नवी कार घेण्याचा विचार करत असला, तर ‘या’ नवीन लाँच होणाऱ्या कारवर एकदा टाका नजर

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या ऑटोमोबाईल मार्केट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देशातील प्रत्येक कार उत्पादक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार मॉडेल बाजारात लाँच करत आहे. त्याचबरोबर देशात सध्या सुरू असलेल्या दिवाळीच्या वातावरणामुळे वाहन उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांवर डिस्काउंट ऑफर करत आहे. या सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर कार घेण्याचा विचार करत असाल तर, थोडं थांबा कारण तुमच्यासाठी लवकरच बाजारात पुढील नवीन कार दाखल होणार आहेत.

मारुती YTB

मारुतीची येणारी ही नवीन कार बोलेनावर आधारित SUV कार असेल. मारुती ही आपली आगामी कार ऑटो एक्स्पो 2023 लाँच करण्याची शक्यता आहे. या कारमध्ये प्रीमियम फीचर्स उत्तम इंजिन पर्याय उपलब्ध असू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, मारुतीच्या या कारमध्ये 1.0L बूस्टरजेट माइल्ड हायब्रीड पेट्रोल इंजिन आणि 1.2L NA पेट्रोल इंजिन उपलब्ध असू शकते. मारुती YTB ची अपेक्षित किंमत सुमारे 8 लाख रुपये (एक्स-शोरुम) असू शकते.

महिंद्रा बोलेरो निओ प्लस

महिंद्रा आपली आगामी कार महिंद्रा बोलेरो निओ प्लस 2023 च्या सुरुवातीला बाजारात लाँच करू शकते. महिंद्राची बोलेरो कार ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार पैकी एक आहे. महिंद्रा बोलेरो निओ प्लसमध्ये कंपनी कार सीटिंग लेआउट आणि पॉवरट्रेनचा पर्याय उपलब्ध करून देऊ शकते. त्याचबरोबर ही कार 2.2L mHawk इंजिनसह सज्ज आहे. हे इंजिन सहसा थारमध्ये वापरले जाते. महिंद्राच्या या नवीन कारची अपेक्षित किंमत 10 ते 12 लाख पर्यंत असू शकते.

मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती VTB सोबतच मारुती सुझुकी स्विफ्ट लवकरच बाजारात लाँच करू शकते. देशातील ऑटोमोबाईल बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार पैकी मारुती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅक कार आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला ही कार मार्केटमध्ये येऊ शकते. या कारची अपेक्षित किंमत 6 ते 8 लाख रुपये दरम्यान असू शकते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.