Upcoming Electric Bike | भारतात पुढच्या महिन्यात लाँच होणार ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक

टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सगळीकडे इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) चे ट्रेंड सुरू आहे. जगभरातील सर्व ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक व्हेरियंटवर काम करत आहे. कारण जगात प्रत्येक विभागात जवळजवळ इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक बाइक सेगमेंट मध्ये वाढ करत, वाहक निर्माता कंपनी अल्ट्राव्हायोलेट (ultraviolette) पुढील महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. अल्ट्राव्हायोलेट ने येणाऱ्या आपल्या F77 नव्या बाईकची चाचणी सुरू केली आहे. कंपनी आपली ही नवी बाईक सर्वप्रथम भारतातील बेंगलोर शहरांमध्ये आणणार आहे. त्यानंतर कंपनी आपली ही बाईक अमेरिका आणि युरोपमध्येही लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

अल्ट्राव्हायोलेट F77 लुक आणि फिचर्स

अल्ट्राव्हायोलेट च्या F77 ही आगामी इलेक्ट्रिक बाईक रिमोट डायग्नोस्टिक्स, राइड डायग्नोस्टिक्स, मल्टिपल राइड मोड्स, अॅडजस्टेबल सस्पेंशन, ओव्हर-द-एअर (OTA) अपग्रेड, बाइक ट्रॅकिंग, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, ड्युअल-चॅनल ABS इत्यादी फीचर्स सह बाजारात लाँच होण्यासाठी सुसज्ज आहे. या  बाईकच्या मागच्या बाजूला स्पोर्टी लुक देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर साईड पॅनल फ्रेम आणि बॅटरी पॅक व्यवस्थित रित्या कव्हर करण्यात आलेला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 190 देशातील 70,000 हून लोकांनी या बाईची प्री-बुकिंग केली आहे.

एकूण 3 प्रकारात ही इलेक्ट्रिक बाईक होणार लाँच

अल्ट्राव्हायोलेट आपली नवी F77 इलेक्ट्रिक बाईक 3 प्रकारांमध्ये सादर करणार आहे. यामध्ये एअरस्ट्राइक, शॅडो आणि लेझर यांचा समावेश आहे. ही बाईक 25kW इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज आहे. ही मोटार 34.7bhp पॉवर आणि 90Nm टार्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

अल्ट्राव्हायोलेट F77 रेंज

अल्ट्राव्हायोलेट ची F77 ही इलेक्ट्रिक बाईक एका चार्जर 200 किलोमीटर पर्यंतची रेंज देऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बाईक फक्त 2.9 सेकंदामध्ये 0-60 किलोमीटर प्रतितास वेग गाठू शकते. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक बाईकचा कमाल वेग 140 किलोमीटर प्रतितास असेल.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.