InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शरद पवार यांच्या हस्ते ‘सूर सपाटा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

प्रत्येक श्वासागणिक बघणाऱ्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा मातीतला खेळ म्हणजे कबड्डी. कबड्डी हा मातीतला खेळ आज आंतरराष्टीय स्तरावर पकड घेताना दिसतोय.

निर्माते जयंत लाडे आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ हा चित्रपट कबड्डीवर आधारित आहे.  सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवण्यात शिक्षक यशस्वी होतात का? या मुलांचा एक सामान्य विद्यार्थी ते कबड्डीपटू म्हणून झालेला प्रवास किती जोखमीचा असेल? त्या मुलांच्या आयुष्यात कबड्डीमुळे होणारे बदल त्यांच्या आयुष्याला कुठली कलाटणी देतात? हे या चित्रपटात दिसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्या हस्ते ‘सूर सपाटा’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. २२ मार्चपासून ‘सूर सपाटा’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सूर सपाटा चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे यांच्या प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाला माजी कबड्डीपटू अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंचाही या चित्रपटात सहभाग असणार आहे.  ‘सूर सपाटा’ मध्ये तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंत आमने-सामने येणार असून सद्या त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत.

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ‘सूर सपाटा’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘कबड्डी या आपल्या मातीतल्या दर्जेदार खेळाची महती ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याच्या अवाक्यावरून लक्षात येत आहे. जागतिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमधील वाढत्या स्पर्धा आणि स्पर्धकांची संख्या पाहता ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे,’ असे मत अजित पवार यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

‘सूर सपाटा’ची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत चांगलीच रंगली असून चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.