Upcoming Mobile Launch | नवीन वर्षात लाँच होऊ शकतात ‘हे’ मोबाईल, बघा यादी
Upcoming Mobile Launch | टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षामध्ये अनेक मोबाईल (Mobile) उत्पादक कंपन्या आपले स्मार्टफोन बाजारात लाँच (Launch) करणार आहे. यामध्ये प्रत्येक कंपनी आपल्या मॉडेलमध्ये बेस्ट बॅटरी, फीचर्स इत्यादी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये चांगला नवीन मोबाईल विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी लाँच होणाऱ्या काही मोबाईलबद्दल माहिती सांगणार आहोत. हे मोबाईल बाजारामध्ये उत्कृष्ट बॅटरी, कॅमेरा, मेमरी आणि डिझाईनसह सादर केले जाणार आहे.
OnePlus 11 5G
वनप्लस फोनची वाट पाहणाऱ्यांसाठी कंपनी नवीन वर्षामध्ये OnePlus 11 5G हा मोबाईल लाँच करणार आहे. भारतामध्ये हा स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये सर्क्युलर कॅमेरा दिला जाणार आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात उपलब्ध असेल. वनप्लसच्या या मोबाईलची किंमत सुमारे 70,000 रुपयांपर्यंत असू शकते. मोबाईल लाँच झाल्यानंतर या फोनच्या किमतीबद्दल नेमकी माहिती समोर येईल.
Samsung Galaxy S23 सिरीज
सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी Samsung Galaxy S23 सिरीज फेब्रुवारीमध्ये लाँच करू शकते. या सिरीजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येणार आहे. यामध्ये Samsung Galaxy S23, दुसरा Samsung Galaxy S23 Plus आणि तिसरा Samsung Galaxy s20 Ultra या मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये Android 13 आणि क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 ऑक्टा कोअर प्रोसेसर उपलब्ध असू शकते.
iPhone 15
पुढच्या वर्षी Apple iPhone 15 लाँच करू शकते. या फोनमध्ये टाईप सी चार्जिंग सुविधा उपलब्ध असू शकते. कारण युरोपियन युनियनच्या निर्णयानंतर, मोबाईल कंपन्यांना स्मार्टफोनमध्ये टाईप सी चार्जर देणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे आयफोन 15 मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्ससह टाईप सी चार्जर पर्याय उपलब्ध असू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- PM Kusum Yojana | 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थितीतून मिळणार दिलासा, जाणून घ्या नक्की काय आहे योजना
- Mental Health Care | मानसिक थकवा दूर करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो
- Rishabh Pant | IPL 2023 मधून ऋषभ पंत बाहेर?, ‘हे’ खेळाडू करू शकतात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व
- Siddharth Malhotra & Kiara Advani | सिद्धार्थ-कियारा बांधणार लग्नगाठ, ‘या’ दिवशी ठरला लग्नाचा मुहूर्त
- Weather Update | राज्यात थंडीचा कडाका वाढणार?, जाणून घ्या हवामान अंदाज
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.