Upcoming Vivo Mobile | लवकरच होणार Vivo ची ‘ही’ मोबाईल सिरिज लाँच

टीम महाराष्ट्र देशा: देशातील मोबाईल उत्पादक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन तंत्रज्ञानासह आपले नवीन मॉडेल्स बाजारात लाँच करत असते. यामुळे टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक टेलीकम्युनिकेशन कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सवर अधिक बारकाईने काम करते. मोबाईल उत्पादक कंपनी Vivo सुद्धा आपल्या नवीन मॉडेलवर काम करत आहे. या नवीन मॉडेलचे काम पूर्ण झालेले असून Vivo ही सिरिज डिसेंबर म्हणजे लाँच करू शकते.

Vivo डिसेंबरमध्ये आपली Vivo X90 सिरिज लाँच करू शकते. या सिरिजमध्ये Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ या मॉडेल्सचा समावेश असू शकतो. हा येणार Vivo स्मार्टफोन Snapdragon 8Gen 2 चिपसेट सह बाजारात उपलब्ध होऊ शकतो.

Vivo X90 सिरिज फीचर

Vivo X90 सिरीजमध्ये AMOLED डिस्प्ले असू शकतो. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8Gen 2 चिपसेट असू शकतो. त्यासोबतच MediaTek Dimension ची फ्लॅगशिप चिपसेट देखील यामध्ये असू शकते. पण अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Vivo X90 सिरिज कॅमेरा

Vivo X90 सिरिज मध्ये X सिरिज स्मार्टफोनपेक्षा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5x ऑप्टिकल झूमसह 64MP कॅमेरा असू शकतो. या मॉडेल्सला अधिक आकर्षक बनवण्यासाठी यामध्ये 1इंच सेन्सर असण्याची शक्यता आहे.

Vivo X90 बॅटरी

या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4780mAh बॅटरी पॅक असू शकते.

Vivo ने भारतात 25 एप्रिल रोजी 2022 आपली X80 सीरिज लाँच केली होती. या सीरिज मधील स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 54,999 आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.