InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

व्हाॅट्सअॅप फिचर्समध्ये होणार नवे बदल

व्हाॅटसअॅपमध्ये नवनवीन बदल होताना दिसत आहे. आता व्हाॅट्सअॅपवर अॅडव्हान्स सर्चचे फिचर येणार आहे. सध्या युदर सर्च बारमधून हवे असलेली गोष्ट शोधू शकतो. मात्र आता युजर वर्गवारी करून हवी असलेली गोष्ट शोधू शकणार आहे. फोटो, व्हिडीओ, जीआयएफ, ऑडिओ, डॉक्युमेंट, लिंक्स यांची वर्गवारी करून युजर सर्च करू शकणार आहे. तसेच त्याची सर्च हिस्ट्री देखील युजर्सला दिसणार आहे.

व्हाॅटस अॅपवर डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी डार्क मोडचे देखील फिचर देखील येणार आहे. याशिवाय व्हाॅटसअ‍ॅप ग्रुपमध्ये कोणालाही अ‍ॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे  गरजेचे होणार आहे. त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.