InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ‘ही’ अभिनेत्री

हिंदी सिनेसृष्टीनं अनेक दमदार अभिनेत्यांना जन्माला घातलं मात्र ट्रेजडी किंग नावानं प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार एक असे अभिनेता आहेत ज्यांची बात काही औरच आहे. 70-80 च्या दशकात अनेक अभिनेत्री त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेकजणी तासंतास त्यांची वाट पाहत असत.

आज दिलीप कुमार 97 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 11 डिसेंबर 1922 मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे जन्मलेले दिलीप कुमार सध्या सिनेसृष्टीपासून दूर असले तरी एकेकाळी याच बॉलिवूडवर त्यांनी एकहाती राज्य केलं होतं. त्यामुळे आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत.दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान असं आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी हे नाव बदलून दिलीप कुमार असं केलं.

Loading...

त्यावेळी दिलीप कुमार त्यांच्या सिनेमांसोबतच लव्ह रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत राहत असत. खरं तर दिलीप कुमार यांचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. पण सायरा बानो यांच्याशी असलेलं त्यांचं नातं शेवटपर्यंत टिकलं. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 1966 मध्ये लग्न केलं. त्यावेळी सायरा अवघ्या 22 वर्षांच्या होत्या तर दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. पण सायरा यांच्या मते त्या वयाच्या 12 व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दिलीप कुमार यांना जेव्हा ही गोष्ट समजली त्यावेळी त्यांच्या वयातील अंतर आणि 2 वेळा अयशस्वी ठरलेलं प्रेम यामुळे ते सायरा यांच्याशी लग्न करण्याचा विचार टाळत होते मात्र नंतर ते सुद्धा सायरा बानोंच्या प्रेमात पडलेच.

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.