InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी फिरवली मोहन जोशींच्या प्रचारसभेकडे पाठ; बापटांना मात्र पक्षाची साथ

निवडणूक लोकसभेची असो वा महानगरपालिकेची पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पहायला मिळायचा. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी पुण्यातील प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळतंय. त्यामुळे काँग्रेस भवनमध्ये सध्या शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.

आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनही पुण्यात लोकसभेसाठीची कोणती प्रचार यंत्रणा कार्यरत असल्याचे पहायला मिळत नाही.
मागील दोन आठवड्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पत्रकारपरिषदेनंतर प्रचारासाठी कोणीही फिरकले नसल्याचे पहायला मिळतंय.
मागच्या काही दिवसांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील युवकांशी संवाद साधला होता त्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर एकही काँग्रेस नेत्याने प्रचारासाठी पुढाकार घेतलेला पहायला मिळाला नाही. तसेच आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनीही पुण्यातील काँग्रेस उमेदवाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
पक्षाकडून आतपर्यंत मोहन जोशी यांच्यासाठी एकही सभा घेण्यात आलेली नाही. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गिरीष बापट हे भाजपचे उमेदवार आहेत, बापटांनी विविध पद्धतीने प्रचार करत प्रचारत जोरदार आघाडी घेतली आहे,. बापट सध्या पुण्यातील वेगवेगळ्या विभागांचे दौरे करत आहेत तसेच कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा घेत आहेत. यापुर्वीच्या निवडणुकीत काँग्रेस तर्फे बड्या नेत्यांंनी सभा घेतल्या होत्या, मात्र यंदा काँग्रेसचे पुण्यातील प्रचाराचे वारे थंड आहे मात्र बापटांच्या प्रचाराची पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.