कोट्याधीश… भाजप उमेदवार गौतम गंभीरकडे आहे ‘एवढी’ संपत्ती

- Advertisement -
माजी क्रिकेटर आणि भाजपचा पुर्व दिल्ली मतदारसंघातील उमेदवार गौतम गंभीरने काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना त्याने आपली संपत्ती जाहीर केली. यामध्ये संपत्तीच्या बाबतीत गौतम गंभीर दिल्लीतील सर्व उमेदवारांना पिछाडीवर टाकले आहे. गौतम गंभीर हा दिल्लीतील सर्व 349 उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती असलेला उमेदवार आहे.
उमेदवारी अर्ज भरताना गंभीरने आपली संपत्ती जाहीर केली आणि त्यात तो 147 कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचे समोर आले आहे. 2017-18च्या प्राप्ती कर परतावात गंभीरने त्याचे उत्पन्न 12.40 कोटी असल्याचे जाहीर केले आहे, तर त्याची पत्नी नताशाच्या प्राप्ती कर परतावात 6.15 लाखाचे उत्पन्न दाखवले आहे. पश्चिम दिल्ली मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे असलेले महाबल मिश्रा हे दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 45 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.
Loading...
Related Posts
- Advertisement -
महत्त्वाच्या बातम्या –
Loading...