InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मी विरोधकांच्या महाआघाडीला पाठिंबा देण्यास तयार आहे, पण मला उपपंतप्रधान पद हवे’

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे दोन प्रस्ताव ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन केंद्रात सरकार स्थापन करावे आणि त्यास काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असा एक प्रस्ताव आहे.

काँग्रेसला अधिक जागा मिळाल्यास प्रादेशिक पक्षांच्या आघाडीने त्यास पाठिंबा द्यावा आणि त्यात आपणास उपपंतप्रधान पद देण्यात यावे, असा दुसरा प्रस्ताव आहे.

या बैठकीतून केसीआर बिगरकाँग्रेस व बिगरभाजप पक्षांच्या आघाडीची कल्पना सोडण्यास तयार असल्याचे दिसत आहे. अर्थात त्यांच्या उपपंतप्रधानपदासाठी अन्य पक्ष तयार होतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्टॅलिन यांनी पहिला प्रस्ताव अमान्य केला आहे, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी आपला पाठिंबा राहील, असे त्यांनी केसीआर यांना सांगितले आहे. त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देण्यास केसीआर तयार झाले असून, त्यांचा स्वत:साठी उपपंतप्रधानपदासाठीचा आग्रह मात्र कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.