InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

हा अर्थसंकल्प होता की निवडणुकीचे प्रचाराचे भाषण होते जयंत पाटील यांची अर्थसंकल्पावर टिका

- Advertisement -

आज भाजप सरकारने सादर केलेला अर्थ संकल्प म्हणजे जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचा प्रकार असून राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला.
आज राज्याचा अर्थ संकल्प जाहीर झाला. या अर्थ संकल्पावर आमदार जयंतराव पाटील यांनी कडाडून टिका केली.

हा अर्थसंकल्प होता की निवडणुकीचे प्रचाराचे भाषण होते अशी आम्हाला शंका आहे. अर्थसंकल्प मांडताना सुधीर मुनगंटीवार यांच्या चेहऱ्यावर आगामी निवडणुकीतील पराभव स्पष्ट दिसत होता अशी जोरदार टिका आमदार जयंतराव पाटील यांनी केली.

Loading...

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील –

जलयुक्त शिवार हे सरकारचे यश असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले मात्र राज्याच्या वीस हजार गावात भूजलपातळी घटल्याचे मात्र ते सांगू शकले नाहीत.

Loading...

हा अर्थसंकल्प युवक, शेतकरी, मध्यमवर्गीय, ज्येष्ठ नागरिक, दलित अशा साऱ्याच घटकांची निराशा करणारा होता.

शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना या सरकारने जाहीर केलेली नाही.

राज्यावरील कर्जाने चार लाख चौदा हजार कोटींचा आकडा गाठला आहे.

महात्मा फुले, संत रोहिदास व अपंग कल्याण महामंडळासाठी केलेली तरतूद अत्यंत अपुरी आहे. भटके विमुक्त व इतर मागासवर्गासाठी निव्वळ 2892 कोटींची नाममात्र तरतूद केलेली आहे.

राज्यातील अंगणवाड्यांची अवस्था अत्यंत खराब असताना वीज, पाण्यासारख्या मूलभूत सुविधा तिथे नसताना या सरकारने राणा भीमदेवी थाटात 5 हजार आदर्श अंगणवाड्या करण्याची हवेत घोषणा केली आहे.

न्यायाधीशांच्या इमारती आणि घरांसाठी 725 कोटींची तरतूद जरी करण्यात आली असली तरी ती अत्यंत अपुरी आहे.

- Advertisement -

महिला व बालविकास विभाग हा राज्यातील सर्वाधिक महत्वाचा विभाग आहे, मात्र या विभागासाठी फक्त 2921 कोटींची नाममात्र तरतूद केली आहे.

अर्थमंत्र्यांनी राज्यातील 18 ते 35 वयोगटातील किती व्यक्तींना रोजगार मिळाला हे जाहीर करणे अपेक्षित होते, मात्र त्यावर मुनगंटीवार काहीही बोलले नाहीत.

मुंबई, पुणे, पिंपरी – चिंचवड, सोलापूर या शहरांना स्मार्ट सिटीसाठी केवळ 2400 कोटी रुपये दिले आहेत.

सागरमाला सारख्या नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी या सरकारने केवळ 26 कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील विमानतळांच्या विविध सुविधांसाठी केवळ 65 कोटी रुपयात काय होणार आहे असा सवाल आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

राज्यात एकूण 592 एसटी स्थानके आहेत.या स्थानकांच्या नूतनीकरणासाठी तरतूद केलेल्या 101 कोटी रुपयात 592 पैकी दहा स्थानकांचे सुद्धा व्यवस्थित नूतनीकरण होवू शकणार नाही.

मराठा आरक्षण व सवर्ण आरक्षण याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला मात्र यामुळे निर्माण होवू शकणारा संविधानात्मक पेच हे सरकार कसा सोडवणार आहे यावर मात्र कोणतेही भाष्य केले नाही.

प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेचे अपयश आम्ही वारंवार अधोरेखित केले असूनही या योजनेसाठी सरकारने 90 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत असेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या या सरकारने छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक विटही रचलेली नाही. घोषणा केलेला एकही महत्वाचा प्रकल्प या सरकारने पूर्ण केलेला नाही असाही आरोप आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

अर्थसंकल्पात योजना प्रस्तावित करणे अपेक्षित असते मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी भाषणाचा सारा वेळ केवळ सरकारने केलेल्या कामांची यादी वाचण्यात घालवला. एकंदरच हा अर्थसंकल्प न राहता जनतेच्या नजरेत पुन्हा एकदा येण्याची एक केविलवाणी कृती होती असे दिसत होते असेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.