InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आता वजन कमी करण्यासाठी चहा प्या….!!

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर दूधाचा चहा पिणाऱ्या व्यक्ती फार जास्त आहेत.

तुम्हाला माहीत आहे का? असे काही चहा आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरताच पण त्याचबरोबर हे तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतील…

  • व्हाइट-टी शरीरातील नवीन फॅट सेल्स तयार होण्यापासून थांबवण्याचं काम करते. यावर इतर चहांच्या तुलनेत कमी प्रक्रिया करण्यात येतात.
  • ग्रीन टी पेक्षा जास्त ऑन्टी-ऑक्सिडंट यामध्ये आढळून येतात. हा चहा हृदयाचे आरोग्य राखण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासोबतच आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरते.
  • उलॉन्ग टी फॅट सेल्स बर्न करण्यासाठी लाभदायक ठरतो. या चहाचे सेवन केल्यामुळे दोन आठवड्यांमध्ये सहा किलो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • लेमन टी वजन कमी करण्यासाठी मदत करते. तुम्हाला तुमचे वजन वाढल्यासारखे वाटत असेल तर या चहाचे सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.
  • अश्वगंधा टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर हा चहा तुम्हाला मदत करतो. शरीरातील हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्याचे काम हा चहा करतो. तसेच फॅट सेल्स फॅट कमी करण्यासाठी मदत करतो.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.