InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार तब्बल 9 वर्षांनी एकत्र दिसणार राजकीय मंचावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बिहारमधील पटना येथील गांधी मैदानामध्ये सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत तब्बल 9 वर्षांनी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार एकाच राजकीय मंचावर सोबत दिसणार आहेत. एकेकाळी मोदींचे विरोधक असलेले नीतीश कुमार हे आज बिहारमध्ये मोदींबरोबर युतीमध्ये आहेत.

2014 मध्ये याच मैदानावरील मोदींच्या सभेमध्ये बाॅम्बस्फोट झाला होता. त्यामुळे यावेळेस पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांचा मतदार संघ असलेल्या अमेठीमध्ये देखील एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply