InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कोंबडा आरवल्याने झोपमोड होते, पुण्यातील महिलेने केली पोलिसांकडे तक्रार

कोंबडा आरवल्याने झोपमोड झाल्याची तक्रार पोलिसांकडे पुण्यातील एका महिलेने केली आहे, पुण्यातील समर्थनगर पोलीस ठाण्यात एक निनावी तक्रार अर्ज आला आहे.

या तक्रार अर्जात महिलेने म्हटले आहे की, घराजवळ पहाटे साडे चार वाजता कोंबडा आरवतो आणि त्यामुळे झोप मोड होते. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, असे महिलेने म्हटले आहे. महिलेचा हा तक्रार अर्ज वाचून पोलीसही चक्रावून गेले होते.

या अनोख्या तक्रारीची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.