InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गिरीश बापट यांच्या प्रचारात सुनबाई स्वरदा बापट देखील जोरात

पुणे लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपचे उमेदवार असलेले गिरीश बापट यांनी देखील सभा, रॅली, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी याचा धडाकाच लावला आहे. गिरीश बापट यांच्याबरोबरच आता त्यांच्या घरातील सदस्यांनी देखील प्रचाराची धुरा हातात घेतली आहे.

बापट यांच्या सुनबाई स्वरदा यांनी बापट यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून, कार्यकर्ते, व्यापारी तसेच घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेणे या सर्व जबाबदाऱ्या स्वरदा या पार पाडत आहे.

स्वरदा या भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा देखील आहेत. गिरीश बापट यांच्या प्रचारातील व्यवस्थापनाकडे देखील त्यांनी विशेष लक्ष दिले असून, पुण्यातील विविध भागात, विविध घटकांच्या त्या भेटी घेऊन प्रचार करत आहेत. स्वरदा यांच्या या प्रचारामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.