InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुण्यात भाजप उमेदवार गिरीश बापट यांची वरचढ

- Advertisement -

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. गिरीश बापट विरूध्द मोहन जोशी अशी ही लढत चुरशीची ठरणार आहे.

भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जुनी असल्याने राज्यात मंत्री झाल्यानंतरही त्यांनी आधीच लोकसभेची तयारी सुरू केली होती. त्यामुळे त्यांनी पुण्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर त्यांच्या कार्यकाळात विशेष भर दिला. आपल्या कार्यकाळात केलेल्या कामेच घेऊन, बापट लोकांपर्यंत जात आहेत व हाच त्यांच्या प्रचाराचा मुख्य अजेंडा देखील आहे. मेट्रोचे मागील अनेक दिवसांपासून रखडलेले काम अंतिम टप्प्यात आहे.  पुणे- मुंबई हायपर लूप, रिंगरोड, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास मिळालेली मान्यता या गिरीश बापट यांच्या जमेच्या बाजू आहेत.

दुसरीकडे काँग्रेसने पुण्यात भाजपच्या हाती सर्व सत्तासुत्र असतानाही त्यांना शहरातील प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याचा मुद्दा लावून धरलेला दिसून येत आहे. मोहन जोशी यांनी बापट यांच्यावर थेट व्यक्तिगत आरोप करण्यास सुरूवात केली आहे. तसेच काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने पुण्यात अद्याप सभा घेतलेली नाही. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे. बारामती आणि मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज असल्याने, पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसत आहे.

- Advertisement -

यंदाची लढत मोहन जोशी आणि गिरीश बापट यांच्यामध्ये थेट लढत असल्याने, मतांची फाटाफुट होणार नाही. पुण्यात  भाजपची ताकद असतानाही, त्यांनी शिवसेनेला देखील सोबत घेतले आहे. गिरीश बापट गेली अनेक वर्ष पुण्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांनी पुणेकरांची नाडी माहिती आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार देखील योग्य पध्दतीने सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.