राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार नाहीत- एकनाथ शिंदे

‘मनसे’चं महाअधिवेशन सद्या चालू आहे.  यातच आता राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का? अश्या चर्चाना उधाण आले आहे.  महाविकास आघाडीमुळे शिवसेना हिंदुत्वावर मवाळ झालीय. तर मनसे हिंदुत्वावर आक्रमक होणार आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तर राज ठाकरे हे दुसरे हिंदुह्रदयसम्राट असतील असं मत व्यक्त केलं होतं.

राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का ? यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट केवळ बाळासाहेबच आहेत आणि राहतील. दुसरे कुणी हिंदूह्रयसम्राट होवू शकत नाही. पार्टीचा झेंडा बदलून, विचार बदलून काहीही होणार नाही. हिंदुत्वापासून आम्ही दूर जात नाही आणि जाणारही नाही. कुणी काय करतंय त्याचा आमच्यावर काही फरक पडत नाही.

राज ठाकरेंची भविष्यवाणी ठरली खरी; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार

Loading...

23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. ते निमित्त साधून मनसेचा महामेळावा होतोय. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा आज राजकारणात प्रवेश झाला.

अमित यांच्या नावाची घोषणा होत असताना खाली कार्यकर्त्यांमध्ये अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे, आजी, बहिण उर्वशी आणि पत्नी मिताली या बसलेल्या होत्या. अमित यांच्या नावाची घोषणा झाली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी अमित यांच्या आई, आजी आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण…..उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन मनसेची पोस्टरबाजी

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.