तेलगू स्टार महेश बाबू साकारणार २६/११ हल्ल्यातील ‘मेजर’चा जीवनपट

मुंबईत झालेला २६/११ चा हल्ला खूप भीषण होता,संपूर्ण जगाला या हल्ल्याने हादरवून सोडले होते.अतिरेक्यांशी दोन हात करताना भारतीय जवानांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली होती.

या हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करतांना मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले होते. याच संदीप यांच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक चित्रपट येत असून या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली.हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट बनवला जाणार आहे.

मेजर संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये कमांडो म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं.संदीप उन्नीकृष्ण यांच्यावर आधारित लवकरच बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे नाव मेजर असे आहे.अभिनेता अदिवी सेश हा या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत झळकणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या जीएमबी इन्टरटेंन्मेंट या निर्मिती संस्थेमध्ये तयार होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का करणार आहेत. महेश बाबूनेच ट्वीट करून या चित्रपटाबाबत सगळ्यांना सांगितले आहे.

२६/११ च्या दहशदवादी हल्ल्यामध्ये १४ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली होती. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळस्कर, तुकाराम ओंबळे, संदीप उन्नीकृष्ण यांना यात वीरमरण आले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.