InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘उत्तर प्रदेशमधून माणसे बोलवून, कुत्र्यासारखं मारेन’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरू आहे.  माजी पोलीस अधिकारी आणि भाजपच्या घाटल येथील उमेदवार भारती घोष यांनी, जास्त हुशारी दाखवलीत, तर उत्तर प्रदेशातून माणसं बोलावून कुत्र्यासारखं मारेन, अशी धमकीच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

‘स्वत:च्या घरात जा. जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे लपण्यासाठी कोणतीही जागा नाही. मी तुम्हाला घरातून बाहेर काढून कुत्र्यासारखं मारेन. तुम्हाला मारण्यासाठी उत्तर प्रदेशातून हजारो माणसं आणेन,’ अशी धमकी घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply