खासदार आढळराव पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचारात रूग्णवाहिकेचा वापर

शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र प्रचाराला सुरूवात झाल्यानंतरही आता वाद निर्माण होणार असल्याचे दिसते. यावेळी प्रचाराच्या वेळी रूग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी किल्ले शिवनेरी ते तुळापूर अशी विजयाची निर्धार यात्रा काढण्यात आली होती.

यावेळी रूग्णवाहिकेमध्ये वेगवेगळ्या पध्दतीचे वाद्य वाजवत, आढळराव पाटलांचा प्रचार करण्यात आला. मानवी जीवनाला आधार देणाऱ्या या रूग्णवाहिकेचा आता, निवडणुकीचा प्रचारासाठी वापर केला जात असल्याचा प्रकार पहावयाला मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.