InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तापसी पन्नूचा ‘मिशन मंगल’ मधील पहिला लूक तुम्ही पाहिलात का ?

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ चित्रपट चर्चेत आहे. अक्षयशिवाय या चित्रपटात इतरही ७ कलाकार झळकणार आहे. नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटातील आपला पहिला लूक तापसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पण तापसीचा चेहरा या फोटोत चाहत्यांना पाहता येणार नाही. कारण या फोटोत तापसी पाठमोरी बसलेली आहे. तिने या फोटोला कॅप्शन देत या पात्राची ओळखही करून दिली आहे. या चित्रपटात तापसी क्रितीका अग्रवालचे पात्र साकारणार आहे. या फोटोत तिने पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे. यासोबतच तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसत आहे.

भारताच्या मंगळयान मोहिमेवर ‘मिशन मंगल’ हा चित्रपट आधारित आहे. महिलांनी मंगळयान मोहिमेत दिलेल्या अभूतपूर्व योगदानावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी आणि नित्या मेनन या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात असणार आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.