InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘काल मला जग सोडून जावं वाटलं’, धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

- Advertisement -

पंकजा मुंडेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी ही व्हिडिओ क्लिप एडिट केली असल्याचं म्हटलं. तसेच व्हिडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेल्यावर ती दाखल करून घेतली नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी मला काल जग सोडून जावं असं वाटत असल्याचं ते म्हणाले. यावेळी भावनिक झालेल्या धनंजय मुंडे यांना अश्रू रोखता आले नाहीत. व्हायरल क्लिपमध्ये जे काही आहे ते मी बोललो असेल तर स्वत:ला संपवून घेईन. मला माझी स्वत:ची चिंता आहे. मी बहिणीचं नातं पाळणारा माणूस आहे. मला निवडणुकीच्या निकालाची काळजी नाही तर मला घरातल्या नात्यांची चिंता आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले.

Loading...

वादग्रस्त वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर परळीत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, राज्य महिला आयोग धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सुमोटो दाखल करणार आहे. तसेच ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई कऱण्यात येईल असंही राज्य महिला आयोगानं म्हटलं आहे.

- Advertisement -

Loading...

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. यात त्यांनी म्हटलं की, शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन चुकीचं वक्तव्य केल्याचे आरोप फेटाळून लावले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.