InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कमलनाथ सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा; फक्त २५ रुपये कर्जमाफी

मध्य प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी यादीत त्यांचं नाव पाहून चक्रावून गेले आहेत. कारण, या शेतकऱ्यांसोबत कमलनाथ सरकारने अशी थट्टा केलीय, जे पाहून कुणाचाही संताप होईल. अनेक शेतकऱ्यांचं फक्त २५ रुपये ते ३०० रुपयांपर्यंतचं कर्ज माफ झालंय.

जय किसान ऋण मुक्ति योजना मध्य प्रदेशात जाहीर करण्यात आली आहे. सध्या याची अंमलबजावणी सुरु आहे. काही गावांमध्ये लाभार्थ्यांची यादी लावण्यात आली आहे. पण ‘जागरण’च्या वृत्तानुसार, फक्त २५ रुपयांपर्यंतचंच कर्ज माफ झाल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केलाय. जैतपूरच्या एका शेतकऱ्याचं २५ रुपये कर्ज माफ झालं, तर सिकंदरपुरातील शेतकऱ्याचे ३०० रुपये माफ झाले.

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.