InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कपिल शर्माचं पितळ पडलं उघडं !

कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा ‘कपिल शर्मा शो’ सध्या टीआरपी लिस्टमध्ये आहे. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात कपिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तो सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता अजय देवगणकडून पैसे घेताना दिसत आहे. कपिलला असं करताना पाहून त्याचे चाहते खूपच हैराण झाले आहेत.

कपिल शर्मानं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अजय देवगणचा सिनेमा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चं प्रमोशन करताना दिसत आहे. त्यानंतर अजय देवगण तिथे येतो आणि कॅमेरामनला शूट बंद करायला सांगतो आणि कपिलला काही पैसे देताना दिसतो.

Loading...

अजय देवगण कपिलला 1 हजार रुपये देतो. पण या व्हिडीओमध्ये कपिल त्याच्याकडे 1200 रुपयांची डील झाल्याची आठवण करुन देतो. पण अजय त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निघून जातो आणि कपिल सुद्धा गुपचूप ते पैसे त्याच्या पॉकेटमध्ये ठेवतो. कपिल आणि अजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.अर्थात हा व्हिडीओ एका मस्करीचा भाग आहे.

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.