चंदन आरोग्यसाठी उपयुक्त; चंदनाचे आरोग्यदायी फायदे

देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. अनेक कार्यांत त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चंदनाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या…

शिंगाड्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

हे आहेत फायदे

Loading...
  • कमी प्रमाणात भाजल्यास अथवा चटका लागल्यास चंदन तुपात मिसळून लावावे. दाह कमी होतो.
  • चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.
  • शरीराला खाज येत असल्यास अथवा त्वचेसंबंधित एखादी तक्रार असल्यास चंदन अत्यंत गुणकारी ठरते.
  • तणाव दूर करण्यासाठी सुद्धा चंदनाचा उपयोग केला जातो.
  • चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा.
  • त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी चंदन अत्यंत गुणकारी आहे.
  • चेहऱ्यावर मुरूम जास्त असल्यास गुलाब पाण्यात चंदन मिसळून लेप लावा.
  • डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चंदनाचा लेप डोळ्यांच्या खाली लावा.
  • शरीरातील स्नायू दुखत असल्यास चंदनाच्या तेलाने मालिश करावी.

दुधापेक्षा बिअर जास्त पोषक आणि आरोग्यदायी? वाचा…

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.