‘या’ ठिकाणी महाविकास आघाडी तुटणार; काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने

विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केलं आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 आमदारांनी मतदान केलं. तर 4 आमदार तटस्थ राहिल्याचं पाहायला मिळालं. भाजपने सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात एकही मत पडलं नाही. त्यामुळे आता , आणि राष्ट्रवादी संसार सुरू झाला असला तरी भिवंडी महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आणि शिवसेनेमध्ये फुट पाहायला मिळते.

भिवंडीमधील निजामपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि कॉग्रेस पक्षच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांच्या गटात उभी फूट पडल्याचे उघड झाले आहे. तर कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास आर.पाटील यांनी त्यांच्या पत्नी असलेल्या माजी महापौर प्रतिभा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली आहे.

काँग्रेस पक्ष आणि भाजप नगरसेवकांचा एक मोठा गट प्रतिभा पाटील यांच्या सोबत असल्याने काँग्रेस पक्षाच्या गटात भीतीचे वातावरण पसरले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी महापौर पदासाठी चार उमेदवारांनी एकूण 7 तर उपमहापौर पदासाठी सात जणांनी 9 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.