InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुंबईकरचं गटारांवरील झाकणं काढतात; महापौरांनी मुंबईकरांवरच फोडलं खापर

- Advertisement -

गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा चिमुकला नाल्यात पडून वाहून गेला. या घटनेनंतर आज मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यानंतर महाडेश्वरांनी अशा घटनांना प्रशासनाप्रमाणे मुंबईकरही जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

पावसामुळे तुंबलेल्या मुंबईलाही आलबेल म्हणणाऱ्या महापौरांनी, गोरेगावाच्या घटनेचं विश्लेषण करताना मुंबईकरांच्या ‘सिव्हिक सेन्स’ला जबाबदार ठरवले आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी चिमुकला नाल्यात पडल्याच्या घटनेचे खापर मुंबईकरांवरच फोडलं आहे. अनेक ठिकाणी स्थानिक लोक गटारांवरील झाकणं काढत असल्याचा दावा महापौरांनी केला आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.