InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बरोरा यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. बरोरा यांच्या पक्षप्रवेशासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले गेले होते.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला राजीनामा. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या जवळकीमुळे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply