InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘कुठंही घाण पडलेली असली, की माशी धावते’; अनिल बोंडे यांची मीडियावर टीका

कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पिंपरीतल्या पिक विमा कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ‘दोन मुलं उठली, म्हणून मीडिया धावली, कुठंही घाण पडलेली असली, की माशी धावते’ असं वक्तव्य बोंडे यांनी केलं.

पिंपरीत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत गोंधळ झाला होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाषण करत असताना पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा काही जणांनी दिल्या. घोषणा देणारे हे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दुष्काळग्रस्त शेतकरी असल्याची माहिती आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत त्रुटी असल्याची कबुली खुद्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. विमा कंपन्या आणि बँका विमा योजनेसाठी हातभार लावत नसल्याने यात शेतकरी भरडला जातो. पण ही योजना चांगलीच आहे, असं खोत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply