InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा समाजाला नोकरीत 16 टक्के जागा मिळणार – विनोद तावडे

मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. शिक्षकांच्या प्रस्तावित 24 हजार जागांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के जागा मिळणार आहेत. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा कालच झाली, त्यानंतर आता तातडीने अंमलबजावणीही होणार आहे. लवकरच शिक्षक भरती होणार आहे, त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार का, असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, मराठा समाजाला शिक्षक भरतीत 16 टक्के म्हणजेच 3 हजार 840 जागा राखीव असतील असं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.