InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मी बिग बॉस मध्ये जाणार नाही; तनुश्रीचं स्पष्टीकरण तरीही मनसेचा आरोप ????

राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, म्हणून त्यांनी गुंडांना एकत्र आणून स्वत:चा पक्ष स्थापन केला, असा घणाघात तनुश्रीनं केला होता. यावर मनसेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख अमेय खोपकर प्रतिक्रिया दिली होती. ‘तनुश्रीला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचं असल्यानं तिच्याकडून बेताल विधानं केली जात आहेत’ असे अमेय खोपकर म्हणाले.

पण तनुश्री दत्ताने News 18 Lokmat मध्ये दिलेल्या मुलाखतीनुसार ती बिग बॉस मध्ये सहभागी होण्यास इच्छुक नाही असे आधीच स्पष्ट केले आहे आणि ‘बिग बॉस या शो पेक्षा माझी लेव्हल खूप उंच आहे.’ असेही तनुश्री ने स्पष्ट केले आहे. तसेच ‘मी अमेरीकामधून ६ महिन्यांच्या सुट्टीसाठी आलेली आहे त्यामुळे मी बिग बॉस मध्ये जाऊ शकत नाही’, असे तनुश्री ने सांगितले आहे. त्यामुळे मनसे स्वतःला वाचवण्यासाठी तनुश्रीवर असे  आरोप करत आहे का? नेमकं काय आहे या मागे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केले गंभीर आरोप,पहा ही संपूर्ण मुलाखत

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केले गंभीर आरोप,पहा ही संपूर्ण मुलाखत

Geplaatst door News18 Lokmat op Woensdag 26 september 2018

महत्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply