UPSC Recruitment | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांच्यामार्फत मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यासाठी आयोगामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
यूपीएससी (UPSC Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 1261 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्रीय आरोग्य सेवेच्या सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी उप-संवर्गातील वैद्यकीय अधिकारी श्रेणी: 584 पदे, रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय , वैद्यकीय अधिकारी: 300 पदे, नवी दिल्ली नगरपरिषदेत जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर: 1 पद, दिल्ली महानगरपालिकेत जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर ग्रेड-II: 376 पदे भरण्यात येणार आहे.
सरकारच्या या भरती (UPSC Recruitment) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (UPSC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 9 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://upsconline.nic.in/upsc/OTRP/
जाहिरात पाहा (View ad)
https://www.upsc.gov.in/sites/default/files/Notice-CMSE-23-190423-eng.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | हवामानात होणार पुन्हा मोठा बदल! पंजाबराव डख यांनी व्यक्त केला अंदाज
- National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Heatwave Alert | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार, ‘या’ भागांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा
- Union Bank of India | युनियन बँकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Gulakand Benefits | उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
Comments are closed.