UPSC Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! यूपीएससीमार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी (UPSC) तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

यूपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 1255 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षा या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://upsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी (UPSC Recruitment) इच्छुक उमेदवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://upsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या