Urfi Javed | उर्फीची अतरंगी फॅशन! कापडाचा सोडून मोबाईलचा बनवला ड्रेस

मुंबई : बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) फेम आणि इंटरनेट सेन्सेशन (Internet Sensation) उर्फी जावेद (Urfi Javed) फॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य आहे. कारण उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. त्याचबरोबर तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामुळे उर्फीला अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. कारण उर्फीने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट केले आहे. यामध्ये तिने दगड, ब्लेड, चमकी तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून ड्रेस तयार करून परिधान केले आहे. सध्या उर्फीने असाच काहीतरी प्रकार केला आहे. तिचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद (Urfi Javed) चा नवीन व्हिडिओ व्हायरल

उर्फी जावेद नेहमी तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. तिने तिच्या कपड्यांवर अनेक एक्सपिरिमेंट केले आहेत. यामध्ये ती वेगवेगळ्या गोष्टींपासून त्याचे कपडे तयार करत असते. सध्या तिने असाच काहीतरी ड्रेस तयार करून परिधान केला आहे. तिने तयार केलेल्या ड्रेसचा कोणी अंदाज देखील लावू शकत नाही. उर्फीने यावेळी चक्क कपड्यांच्या ऐवजी मोबाईलचा उपयोग कपडे म्हणून केला आहे. या लुकमध्ये उर्फीने निळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने खाली निळ्या रंगाची मॅचिंग पॅन्ट ही घातली आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर तीने ‘मेरा बालम ठाणेदार हे’ गाणे लावले आहे.

उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर उर्फीला नेटकऱ्यांकडून होणाऱ्या टीकांना देखील सामोरे जावे लागत आहे. उर्फीच्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनवर नजर टाकली तर यामध्ये नेटकऱ्यांनी कमेंट्स वर्षाव केला आहे. यामध्ये एका युजरने कमेंट केली आहे, “खाली लॅपटॉपचा स्कर्ट बनवायचा असता पॅन्ट का घातली आहे.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटले आहे, “माझा मोबाईल परत कर उर्फी.”

उर्फी जरी कोणत्या सिनेमात दिसत नसली, तरी बिग बॉसनंतर उर्फीचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. इंस्टाग्रामवर उर्फीचे 3.6M फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामद्वारे उर्फी तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.