Urfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशन आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद फॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे आता नेटकऱ्यांनी सोडून दिले आहे. कारण उर्फी कपड्यांवर कोणत्याही प्रकारचे एक्सपिरिमेंट करू शकते. तिच्या या फॅशनमुळे मोठा वादविवाद देखील निर्माण झाला होता. भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवरून पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला होता. पण ऐकेल ती उर्फी कसली? उर्फीने या सगळ्या वादविवादाकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्फी पुन्हा एकदा अतरंगी कपड्यांमध्ये दिसतं आहे.
उर्फी जावेदने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चक्क कपड्याने ऐवजी प्लास्टिकची पिशवी गुंडाळलेली दिसत आहे. उर्फीने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे आणि खाली प्लास्टिकची पिशवी गुंडाळली आहे. उर्फीचा हा नवीन लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहे.
Urfi Javed | उर्फीच्या फॅशनचा कहर! कपड्यांच्या ऐवजी गुंडाळली प्लास्टिकची पिशवीhttps://t.co/hqgdZF47en
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) February 4, 2023
उर्फी जावेद (Urfi Javed ) च्या पोस्टवरील कमेंट्स
उर्फीच्या विचित्र फॅशनमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. उर्फीने तिचा हा प्रकार बंद केला नाही तर मी तिला थोबाडेल अशा शब्दात चित्रा वाघ यांनी तिला इशारा दिला होता. त्यानंतर या दोघींमध्ये चांगलाच वादविवाद सुरू झाला होता. त्यांचा हा वाद राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला होता.
महत्वाच्या बातम्या
- Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त
- Abhay Bang | “महाराष्ट्राचे राजकारण दारूच्या पैशांवर…”; डॉ. अभय बंग यांचं मोठं विधान
- IND vs AUS | कसोटी मालिका सुरू होण्याआधी BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूंच्या संघात समावेश
- Chandrakant Patil | भाजपने कसब्यातून मुक्ता टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले…
- INC | “सरकार आधीच अस्थिर, मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कोलमडेल”; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा