Urfi Javed | उर्फी जावेदने घातला गुलाबाच्या पाकळ्यांचा ड्रेस; चाहते झाले घायाळ | पहा VIDEO

महाराष्ट्र देशा डेस्क : नेहमीच अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असणारी बिग बॉस स्टार उर्फी जावेद हीची फॅशन सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडची आहे. ती कधी प्लास्टिकपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये, तर कधी फक्त फुलांच्या ड्रेसमध्ये दिसते. ती कधी कॉटन कँडीमध्ये तर कधी पोत्याच्या कापडापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पण दिसली एवढं नाही तर तिने चक्क वर्तमानपत्रापासून बनलेला ड्रेसही परिधान केला होता. उर्फी प्रत्येक वेळा तिच्या जुन्या ड्रेसपेक्षा अधिक बोल्ड ड्रेस परिधान करते आणि चाहत्यांना आश्चर्यचकित करते. असाच एक नवीन ड्रेस घातलेला व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेयर केला आहे.

या व्हिडिओत उर्फी जावेद हिने गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला ड्रेस घातला आहे. गुलाबी रंगांच्या पाकळ्या तिच्या या टू पीस ड्रेसवर लावलेल्या आहेत. ज्या पाकळ्या ड्रेसवर लावल्या आहेत, अगदी तश्याच पाकळ्या खाली ठेवलेल्या आहेत आणि त्यावरच उर्फी झोपलेली आहे. हा व्हिडीओ टॉप अँगलने शूट केलेला आहे. व्हिडिओत उर्फी तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत आहे. तसेच तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात होत आहे. या व्हिडीओला उर्फीच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओला १ तासात ५० हजारांहून जास्त लाईक्स आल्या आहेत.

उर्फीच्या अतरंगी कपड्यांमुळे तिला नेहमीच ट्रोल केलं जात. काही दिवसांपूर्वी तिने सुतळी सारख्या दिसणाऱ्या दोरीपासून बनवलेली ब्रा घालून फोटोशूट केले होते. त्यानंतर तिने धारदार ब्लेडपासून बनलेला वन पीस ड्रेस घातला होता. तेव्हाही उर्फीला ट्रोल केलं गेलं. पण या सगळ्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. ती तिच्या कपड्यांमध्ये नवनवीन आणि अजब प्रयोग असते.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.