Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत, पाहा ‘या’ लूकमधील HOT PHOTO

मुंबई: बिग बॉस OTT फेम उर्फी जावेद Urfi Javed ही आपल्या वेगवेगळ्या लुकमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने नेहमी तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण करत असते. उर्फी ने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस असे अनेक लुक बघायला मिळतात. त्याचबरोबर तिने दगडांपासून, ब्लेड पासून, चमकी पासून तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून ड्रेस डिझाईन करत असते. सध्या उर्फीने असाच काहीतरी ड्रेस परिधान केला आहे. ज्याचा कुणी स्वप्नात देखील विचार करू शकत नाही.

उर्फी जावेद चा नवा अवतार

उर्फी जावेदने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने चाहत्यांना परत एकदा आश्चर्याचा झटका दिला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी एका रॉयल ब्लू कलरच्या शर्ट मध्ये दिसत आहे जो फक्त समोरून आहे. आणि तिने तो शर्ट ब्रालेस परिधान केला आहे. हा शर्ट मागून पूर्णपणे बॅकलेस आहे. या बॅकलेस शर्टमुळे उर्फी आणखीनच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. या बॅकलेस शर्ट खाली उर्फीने काळ्या रंगाची शॉर्ट परिधान केलेले असून निळ्या रंगाचे कानातले घातलेले आहेत. या लुक मध्ये तिने केसांची हाय पोनी बांधली असून हलक्या स्वरूपाचा मेकअप केलेला दिसत आहे.

उर्फी झाली नेटकऱ्यांकडून ट्रोल

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी आपल्या अतरंगी फॅशनचे चर्चेत राहते. याच फॅशन सेन्समुळे उर्फी नेटकऱ्यांकडून नेहमी ट्रोल देखील होते. उर्फी ने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या या बॅकलेस शर्टच्या व्हिडिओमुळे उर्फीला परत एकदा नेटकऱ्यांकडून ट्रॉलिंग सहन करावी लागत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स वर्षाव केला आहे. यामध्ये एका नेटकरांनी कमेंट करत म्हटले आहे, “तेच म्हटलं समोरून बघून असं वाटतंय आज तू एवढे कपडे कसे घातले”. तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “अजून तू किती याचं प्रदर्शन करणार आहे”.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.