Urfi Javed | कॅसेटचा गाणे ऐकण्याव्यतिरिक्त असाही उपयोग करता येतो, पाहा उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ

मुंबई: बिग बॉस OTT फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद Urfi Javed फॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने नेटकऱ्यांना चकित करून सोडते. उर्फीने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट करत न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस असे अनेक लुक केले आहेत. त्याचबरोबर तिने दगडांपासून, ब्लेड पासून, चमकी पासून तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून ड्रेस तयार करून परिधान केले आहे. उर्फीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने वेगळाच एक्सपिरिमेंट केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उर्फीने चक्क कॅसेट पासून तयार केलेला ड्रेस परिधान केला आहे. कॅसेटचा गाणे ऐकण्याव्यतिरिक्त असाही उपयोग होऊ शकतो असे तिने दाखवून दिले आहे.

उर्फी जावेद चा कॅसेट लुक

आजपर्यंत आपण फक्त कॅसेटचा गाणे ऐकण्यासाठीच वापर करत आलेलो आहोत. पण इंटरनेट फॅशन सेन्सेशन उर्फी जावेद हिने दाखवून दिले आहे की कॅसेटचा फक्त गाणे ऐकण्यासाठी नाही तर कपडे बनवण्यासाठी देखील आपण उपयोग करू शकतो. उर्फीने सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चक्क कॅसेट पासून बनवलेला ड्रेस परिधान केलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कॅसेटमध्ये असलेल्या रिल्सचा तिने ड्रेस बनवला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, ” तुम्ही कधीच अंदाज लागला नसेल, पण जुन्या कॅसेटच्या रिल्स पासून हा ड्रेस बनवला आहे.
रिल्स साठी रिल्स.”

Urfi Javed च्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव

उर्फीने नुकताच शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षा होत आहे. तिच्या या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ” अरे देवा या बाईने फॅशनच्या बाबतीत सगळ्यांना मागे सोडले आहे, आता सगळ्या फॅशन डिझायनरनी हिच्याकडून सल्ला घ्यायला पाहिजे.” तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला आहे, ” ज्यांनी ज्यांनी कॅसेट जपून ठेवलेले आहेत त्यांना त्याचा आता उपयोग  होणार.”

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.