Urfi Javed | चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर उर्फीने स्वतःला घातल्या बेड्या, शेअर केला बोल्ड VIDEO

Urfi Javed | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ऊर्फीच्या विरोधात पोलीस तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर दिले होते.

उर्फी जावेदच्या कपड्यावरून वाद सुरू असताना तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत उर्फी जावे तीन चित्रा वाघ यांना डिवचलं आहे, असं दिसत आहे. तिने बिकनीमध्ये बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली आहे. या व्हिडिओला तिने कॅप्शन दिले आहे,”माझ्या हातात वेड्या घातलेल्या तुम्हाला बघायचं होतं ना, तुमची इच्छा मी पूर्ण केली.”

उर्फीच्या चित्रविचित्र कपड्यामुळे चित्रा वाघ यांनी तिच्या विरोधात पोलीस तक्रार केली होती. त्याचबरोबर त्यांनी महिला आयोगाने रूपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका केली होती. प्रत्येकाला काय परिधान करावे याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने परिधान केलेले कपडे सर्वांनाच अश्लील वाटता असे नाही. त्यामुळे अशा बाबतीत आयोग वेळ वाया घालू शकत नाही, असं रूपाली चाकणकर त्यावेळी म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या