Urfi Javed | चित्रा वाघ यांच्या वक्तव्याला उर्फी जावेदने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली…

Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन (Fashion) सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी फॅशन म्हणून कधी काय करेल, याचा चाहत्यांना अंदाज लावणे आता अशक्त झाले आहे. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात पोलीस तक्रार केल्यानंतर उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यmaतून त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या,”उर्फी मला कुठं दिसली तर, मी तिला थोबाडून काढेल.” त्यांच्या या वक्तव्यानंतर उर्फी आणि त्यांच्यातील वाद अधिक वाढला आहे.

अशा परिस्थितीमध्ये उर्फीने पुन्हा आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये उर्फी म्हणाली आहे,”राजकीय लोकांविषयी बोलणं माझ्यासाठी हानिकारक ठरू शकतं, हे मला माहीत आहे. पण ती लोक मला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोलून माझा खून करून घेईल किंवा मी आत्महत्या करेन. या सगळ्यांची सुरुवात मी केली नाही. मी कुणाबरोबर चुकीचं वागलेले नाही. काही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे.”

Screenshot 2023 01 04 110528 Urfi Javed | चित्रा वाघ यांच्या वक्तव्याला उर्फी जावेदने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली...
Urfi Javed | चित्रा वाघ यांच्या वक्तव्याला उर्फी जावेदने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली…

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वादविवाद सुरू असताना, त्यामध्ये शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भर घातली आहे. त्यामुळे हा वाद अधिकच पेटला आहे. या वादामध्ये सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस व कंगना रानौत यांचे फोटो शेअर करत सवाल उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.