Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं

Urfi Javed | मुंबई : राज्यात सध्या अनेक विषयांवरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे आता राज्याच्या राजकारणात मोठं वादंग सुरु आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर टीका केली तर कोणी शीतल म्हात्रेंवरच अश्लिल चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरुर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत शीतल म्हात्रेंचं समर्थन करत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Urfi Javed Criticize Chitra Wagh Regarding Sheetal Mhatre viral video

त्यातच आता सोशल मीडियावर नेहमी आपल्या कपड्यांवरुन चर्चेत असणारी बीग बॉस फेम उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात उर्फीच्या कपड्यांवरुन मोठा वाद झाला होता. त्यानंतर या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.

ढोंगीपणाची पण सीमा असते, हे कोणीतरी सांगा या बाईला”

“ती वेळ विसरली जेव्हा माझ्या कपड्यांमुळे माझ्या चारित्र्यावरर बोट उचलत होती. मला जेलमध्ये टाकण्याची मागणी करत होती. उघडपणे माझं डोकं फोडण्याची धमकी देत होती. वाह…वाह.. ढोंगीपणाची पण सीमा असते, हे कोणीतरी सांगा या बाईला”, असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना डिवचलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.