Urfi Javed | पाकिस्तानकडून कौतुक झाल्यावर उर्फी जावेद झाली अधिक सुसंस्कृत, पाहा व्हिडिओ

मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन (Social Media Sensation) उर्फी जावेद (Urfi Javed) ने नुकताच आपला नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांना चक्क आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडिओमध्ये उर्फीने अतरंगी फॅशन सोडून चक्क सुसंस्कृत अवतार केला आहे. यापूर्वी आपण पाहिले आहे की, उर्फीने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट केले आहे. यामध्ये तिने न्यूड, सेमी न्यूड, टॉपलेस असे अनेक लोक केले आहेत. त्याचबरोबर तिने चमकी, लोकर, बँडेज, दगड तर कधी ब्लेड पासून ड्रेस तयार करून परिधान केल्याचे आपण पाहिले आहे. पण उर्फीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने चक्क सुसंस्कृत कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. उर्फीला पाकिस्तानकडून प्रशंसा मिळाल्यानंतर उर्फीने हा सुसंस्कृत अवतार केला आहे.

उर्फी जावेदचा (Urfi Javed) सुसंस्कृत अवतार

अलीकडेच पाकिस्तानी अभिनेत्री हानिया अमीरने उर्फी जावेदचे कौतुक केले होते. हानिया अमीरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर उर्फीच्या नावाची पोस्ट शेअर करत त्यामध्ये ‘प्रीटी’ असे लिहिले होते. त्यानंतर उर्फीने तिची अतरंगी फॅशन सोडून सुसंस्कृत पोशाक परिधान केला आहे. तिचा हा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत. कारण नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी या सुसंस्कृत लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

पाकिस्तानी कलाकार हानियाच्या सुपरहिट शो ‘मेरे हमसफर’च्या गेटउप मधील लुक करत उर्फीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या मध्ये उर्फीने गुलाबी रंगाचा सूट परिधान केलेला आहे. त्याचबरोबर या गेटअप सोबत तीने कपाळावर मांग टिक्का सजवलेला आहे. तर दुसरीकडे तिने डोक्यावर घेतलेली ओढणी या लुकला अजून आकर्षक बनवत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीला तिने हानिया आमिरच्या सुपरहिट शो मेरे हमसफरचे टायटल सॉंग लावले आहेत. हानिया अमीरच्या ‘हाला’ या पात्राच्या लुक मध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत आहे.

अलीकडेच पाकिस्तानी कलाकार हानिया अमीरने उर्फीचे सोशल मीडियाद्वारे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली होती. त्याचबरोबर उर्फी देखील हानिया अमीरची एक मोठी फॅन आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हानिया अमीरचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तीने हानिया अमीरची प्रशंसा करत लिहिले होते, “तू किती सुंदर आहे.” उर्फी ने या पोस्टमध्ये हनीयाला टॅग देखील केले होते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.