Urfi Javed | फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस परिधान केल्यावर उर्फी झाली ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद Urfi Javed ही आपल्या वेगवेगळ्या फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने नेहमी तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण करत असते. उर्फीने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट केलेले करत न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस असे अनेक लुक केले आहेत. त्याचबरोबर तिने दगडांपासून, ब्लेड पासून, चमकी पासून तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून ड्रेस तयार करून परिधान केले आहे. उर्फी तिच्या या फॅशन नेहमीच्या त्यांना आश्चर्याचा धक्का देत असते. सध्या उर्फेने असाच काहीतरी आश्चर्यचकित लुक केला आहे.

Urfi Javed चा नवा लूक

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी आपल्या वेगवेगळ्या फॅशन मुळे चर्चेत राहते. सध्या उर्फीने असाच काहीतरी ड्रेस परिधान करून परत एकदा चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण केली आहे. उर्फी ने तिच्या सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट लुक शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चक्क फुफ्फुसाच्या आकाराचे डिझाईन केलेले बॅकलेस टॉप परिधान केलेले दिसत आहे. उर्फीचा हा लुक बघून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी उर्फीच्या या लुकवर कॉपीकॅटचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा लुक बेला हदिदच्या लुकची कॉपी आहे जो तिने कान्स फेस्टिवल 2021 मध्ये केला होता.

उर्फी ने तिचा हा नवीन लुक तिच्या इंस्टाग्राम हँडल वरून शेअर केला आहे. या पोस्टला उर्फीने कॅप्शन दिले आहे, ” धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.”

उर्फीच्या या पोस्टवर युजर्स कडून झाला कॉमेंट्सचा वर्षाव

उर्फी ने नुकताच शेअर केलेल्या तिच्या या लुक वर नेटकऱ्यांकडून कमेंट्स वर्षाव होत आहे. पूर्वीच्या या पूर्ण लुक बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये उर्फीने फुफ्फुसाच्या आकाराचे बॅकलेस टॉप परिधान केलेले असून त्याखाली बॅगी पॅन्ट परिधान केली आहे. उर्फीच्या पोस्टवर एकवापरकर्ता कमेंट करत म्हणाला आहे, ” देवा देवा, या पोस्ट ने सगळं मुड खराब केला आहे.” तर दुसरा कमेंट करत म्हणाला आहे, “धूम्रपानापेक्षा जास्त तू घातक आहेस.”

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.