Urfi Javed | वाढदिवसापूर्वी उर्फी ने शेअर केला तिचा ‘हा’ बोल्ड व्हिडिओ

मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्फी जावेद ही आपल्या वेगवेगळ्या लुक मुळे नेहमी चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने नेहमी तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण करत असते. उर्फी ने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस असे अनेक लुक बघायला मिळतात. दगडांपासून, ब्लेड पासून, चमकी पासून तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून उर्फे तिचे ड्रेस डिझाईन करत असते. सध्या उर्फीने असाच एक अतरंगी लुक करून आपला नवीन व्हिडिओ वाढदिवसापूर्वी सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाढदिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ मिळाली आहे.

उर्फी जावेदचा वाढदिवसापूर्वीचा लुक

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसापूर्वी शुक्रवारी उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक नवीन व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये उर्फी पिंक कलरच्या एका आउटपुट मध्ये दिसत आहे. पिंक कलरचा आऊटफिट उर्फीची बोल्डनेस आणि हॉटेनेस आणखीनच वाढवत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीचे नुकतेच रिलीज झालेले गाणे ‘हाय हाय ये मजबुरी’ पार्श्वभूमी संगीत म्हणून लावण्यात आलेले आहे. उर्फीने हा व्हिडिओ तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी शेअर केलेला आहे. उर्फी तिच्या  25 व्या वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप उत्साहित आहे. सध्या ती तिचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये व्यस्त आहे.

उर्फीचा नवीन व्हिडिओ

नेहमीप्रमाणेच उर्फीचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. उर्फीचे चाहते तिच्या या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद देत आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर आणि भरपूर लाइक आणि कमेंट देखील आल्या आहेत. उर्फीच्या या पोस्टवर एकाच चाहत्याने कमेंट करत म्हटले आहे, ” मला हा ड्रेस खूप आवडलेला आहे. आणि हो, माझी जर अशी फिगर असती तर मला हा ड्रेस घालायला नक्कीच आवडला असता. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.