Urfi Javed | ही कोणती फॅशन!, उर्फी जावेदने गुंडाळली शरीरावर चिकटपट्टी
Urfi Javed | मुंबई: बिग बॉस OTT (Big Boss OTT) फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) फॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने नेटकऱ्यांना चकित करून सोडते. उर्फीने असाच काहीतरी अतरंगी लुक केला आहे. त्याचा कुणालाही अंदाज लावता येणार नाही. नुकतच उर्फी जावेदने तिच्या अतरंगी फॅशन प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उर्फी जावेदने यावेळी ही तिच्या फॅशनचे नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करून सोडले आहेत. नुकताच उर्फीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी उर्फीने कपड्यांनी शरीर न झाकता चक्क चिकटपट्ट्या लावून शरीर झाकले आहेत. होय! उर्फीने यावेळी चिकटपट्ट्यांचा वापर करून ड्रेस तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने लाल रंगाच्या चिकटपट्ट्या आपल्या शरीरावर गुंडाळलेल्या असून त्यावर गडद लाल रंगाची लिपस्टिक लावलेली आहे. या लुकमध्ये ती जमिनीवर झोपलेली असून चकटपट्ट्यांनी तिने स्वतःला बांधून घेतले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या कमेंट सेक्शनमध्ये टीकांचा मारा सुरू केला आहे.
Urfi Javed | ही कोणती फॅशन!, उर्फी जावेदने गुंडाळली शरीरावर चिकटपट्टीhttps://t.co/dAwUMjyyjh
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 3, 2022
उर्फी जावेदचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्फीने केलेले या अतरंगी लुकवर नेटकरी मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहे. यामध्ये एक नेटकरी कमेंट म्हणाला की,”उर्फी म्हणजे जगातले आठवा आश्चर्य”. तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”तिच्यासारख्या मुली भारतीय संस्कृतीचा नाश करत आहे, यांना भारतातून हाकलून दिले पाहिजे.” तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”लोकांना लाज वाटली पाहिजे हिच्यासारख्या मुलीला फॉलो करायला.”
उर्फीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहे. पण त्याचबरोबर दुसरीकडे उर्फीला ट्रोल देखील करण्यात आले आहे. नेटकरी उर्फीला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे उर्फी देखील आता ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही. मस्त मोला स्टाईलमध्ये ती तिचे फॅशन एक्सपिरिमेंट सुरूच ठेवते आणि सोशल मीडियावर शेअर करत असते.
महत्वाच्या बातम्या
- Udayanraje Bhosale | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे कडाडले, आझाद मैदानावर काढणार मोर्चा
- Udayanraje Bhosale | …तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिलं असतं – उदयनराजे भोसले
- Udayanraje Bhosale | राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजे आक्रमक! म्हणाले, “लाजा वाटल्या पाहिजेत, वैयक्तिक स्वार्थासाठी…”
- Mercedes SUV Launch | मर्सिडीजची नवीन एसयुव्ही लाँच, करेल ‘या’ कारसोबत स्पर्धा
- Sanjay Raut | …तर तुमच्या शिव्यांचं महाराष्ट्र कौतुक करेल, पण… ; संजय राऊतांचे गायकवाडांना चॅलेंज
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.